खानापूर : कर्जाचा बोजा सहन न झाल्याने विष प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील आवरोळी गावात घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, महेश लक्ष्मण नागन्नावर (वय 50) या शेतकऱ्याला कर्जाचा बोजा जास्त झाला होता. त्यांनी अनेक सोसायटी, बँका, फायनान्स मधून कर्जे काढली होती. त्यातच पाऊस नसल्याने 4 एकर शेतातील पिके वाळून गेली होती. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सदर शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व अत्यवस्थ झाला असता, त्याला ताबडतोब बेळगाव येथील खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचाराचा उपयोग न झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta