Wednesday , March 4 2026
Breaking News

आयशरची ट्रकला धडक; एक ठार, चार जखमी

Spread the love

 

खानापूर : नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागून आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) यांचा पाय निकामी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर ट्रकने नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागच्या बाजूने धडक दिल्याने आयशरमध्ये डाव्या बाजूला बसलेले संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर यांना अतिरक्तस्राव झाल्याने जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी खानापूर येथील सरकारी दवाखान्याकडे धाव घेतली. व स्वतः त्या ठिकाणी थांबून डॉक्टरना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले. व नारायण कडोलकर यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आले.
या अपघातात आयशर मध्ये बसलेल्या वैभवी विठ्ठल मनोळकर (वय 41) संगरगाळी, व अझीत फिलीप लिमा (वय 45) संगरगाळी या दोघी महिला व फिलिप बस्ताव लिमा (वय 60) संगरगाळी व विठ्ठल शांताराम मनोळकर (वय 49) संगरगाळी हे दोघे नागरिक गंभीर जखमी झाले. चार जखमी पैकी तिघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून, पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले. तर एका किरकोळ जखमीवर‌ खानापुरात उपचार करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *