खानापूर : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे उंदरी. गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार नैवद्य दाखविण्याची प्रथा काही भागात आहे. यानिमित्ताने आज रविवारी 17 सप्टेंबर रोजी खानापूरच्या आठवडी बाजारात बकरी बाजार भरला होता. बकरी बाजारात यावर्षी करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. बकरी खरेदीसाठी आणि बाजार पाहण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची तोबा गर्दी झालेली पाहायला मिळाली.
ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बकरी खरेदी केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक गावातील वस्तीवड्यातील लोक बोकड खरेदीसाठी खानापूर बाजारात गर्दी केली होती. बेळगांव खानापूर रस्त्यावरील मऱ्याम्मा देवी मंदिराच्या समोरील पटांगणात बकरी बाजार भरला होता. बाजारात झालेल्या गर्दीमुळे खानापूरहून बेळगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांना ट्राफिक जामचा सामना करावा लागला.
Belgaum Varta Belgaum Varta
