खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली.
रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली असून काही प्रमाणात दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू होती. सध्या तोपिनकट्टी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta