
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चांद्रयान-३ मोहिमेत सहभागी झालेले खानापूर तालुक्यातील अनगडी गावाचे सुपुत्र कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा त्यांच्या अनगडी येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या आई-वडीलांच्या समवेत शाल, श्रीफळ व म. ए. समितीचे स्मृतिचिन्ह देऊन समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, शहर उपाध्यक्ष श्री. मारुती गुरव, मध्यवर्ती सदस्य रामचंद्र गांवकर, समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते राजाराम देसाई व ब्रम्हानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खानापूर तालुक्यातील अनगडी सारख्या दुर्गम भागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांने घेतलेल्या या गरूडझेपेचे विशेष कौतुक करण्यात आले. मराठी माध्यमाचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात हे श्री. पेडणेकर यांनी अधोरेखित केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta