Monday , December 8 2025
Breaking News

“त्या” तरुणाचा घातपात झाल्याचा संशय!

Spread the love

 

खानापूर : गेल्या शनिवारपासून बेपत्ता झालेल्या कोडचवाड येथील तरुणाचा शोध मंगळवारी दिवसभर सुरू होता. त्या तरुणाचा खून झाल्याचा संशय बळावत असल्याने मलप्रभा नदी प्रवाहात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. दरम्यान, तरुणाचा मोबाईल फोन आणि शाळेची बॅग नदीत सापडली असून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कोडचवाड येथे येणारा संपतकुमार बडगेर हा शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास खानापूरकडे निघाला. खानापूरला न जाता तो चापगाव, यडोगा मलप्रभा नदीच्या पुलावर थांबला. त्या ठिकाणी असलेल्या पुलाच्या बाजूला झाडीत दुचाकी फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. येडोगा धरणापासून काही अंतरावर पाणथळ भागात ही बॅग सापडली. धरणाजवळ शोध घेतला असता नदीत मोबाईल आढळून आला. प्रत्यक्षात सकाळपासून पोलीस अथक परिश्रम घेत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार लघु पाटबंधारे विभागाने यडोगा धरणातील पाण्याचा प्रवाह कमी केला. पाणी ओसरल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी पाणी कमी असल्याने मोबाईल सापडला. वाढत्या संशयानंतर, पोलिसांनी आणि तटबंदीच्या तळाशी तरुणांनी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी तरुणाची बॅग व ओळखपत्र असलेली बॅग आढळून आली. शोध मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे.
तरुणाची कोणीतरी हत्या केली असावी, असा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकाळपासून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, डीवायएसपी रवींद्र नाईक, खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, नंदगडचे पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील यांच्यासह 50 हून अधिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान नदीत शोध घेत आहेत. सायंकाळी साडेचार वाजले तरी तरुण सापडला नाही.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *