खानापूर : खानापूर तालुका शेतकरी संघटना व बेळगाव-गोवा महामार्गात जमीन गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवारी गणेबैल येथील टोलनाक्यावर टोल बंद आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या.
भूमिअधिकारण अधिकारी बलराम चव्हाण, प्रांताधिकारी व खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या विषयावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाईक यांनी निवेदन दिले.
यावेळी सीपीआय मंजुनाथ नाईक उपस्थित होते.
खानापूर तालुक्यातील सर्व शेतकरी आणि रहिवाशांना गणेबैल येथील राष्ट्रीय महामार्ग टोलमध्ये संपूर्ण सवलत द्यावी, खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा. तालुक्यातील कळसा भांडुर नाला आणि मलप्रभा नदीचे पाणी आणि कित्तूर प्रत्येक तालुक्याला किमान २ टी.एम.सी. पाणी द्यावे, ड्रेनेजसह सिंचन तसेच विकास प्रकल्प (राष्ट्रीय महामार्ग) साठी संपादित केलेली जमीन प्रकल्पाच्या पूर्व-अंदाजाच्या अधीन राहून संपादित केली गेली आहे. त्यानुसार पूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, विशिष्ट भू-संपादन करण्यात आले आहे. चालू बाजारभाव ठरवणे आणि त्यावर आधारित नुकसानभरपाई अंमलात आणणे. शेतजमीन गमावलेल्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी कायदेशीर लवाद आणि नुकसान भरपाईच्या स्वरुपात निवाडा सध्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे तातडीने एकसमान लोकअदालत घ्यावी.
जुलैमध्ये गणेबैल येथे टोलनाका सुरू करून रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोलनाका सुरू करण्यात आला होता. या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खानापूर येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची आहे दावे आठ दिवसात निकालात काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य झाल्या नसून नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. यासाठी पंधरा दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑक्टोबरपर्यंत ५ नुकसानभरपाई देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता.
यावेळी प्रवीण कोडचवाडकर, प्रल्हाद घाडी, कृष्णा बाळलेनवर, नितीन पाटील, दिपक कोडचवाडकर, शिवाजी पाटील, जयंत तिनेकर, गजानन घाडी, मारुती सुंठकर, सातेरी गुरव, विष्णू चौगुले, मारुती गुरव, किरण पाटील, किशोर हेब्बाळकर, पांडुरंग भातकांडे, संदीप गुरव, मल्हारी गुरव, चौगुले आदी उपस्थित होते.