Saturday , December 13 2025
Breaking News

नंदगड येथे बनावट डॉक्टरच्या क्लिनिकवर छापा

Spread the love

 

खानापूर : आज दि. 18 ऑक्टोबर रोजी नंदगड येथे झालेल्या जनता दर्शनमध्ये बोगस डॉक्टर संदर्भात तक्रार आल्याने, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुन्नादुल्ली, तालुका आरोग्य अधिकारी कीडसन्नावर यांनी नंदगड येथे कोणतीही पदवी नसताना बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू करून औषधोपचार करणार्‍या मकतुम मालदार नावाच्या बनावट डॉक्टरच्या क्लिनिकला भेट दिली. व त्याच्या दवाखान्याची तपासणी करण्यात आली व कागदपत्रे तपासण्यात आली. आणि केपीएमई नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे क्लिनिकला नोटीस बजावण्यात आली व तीन दिवसात नोटीसीला उतर‌ देण्यास सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

Spread the love  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *