
खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर प्रायव्हेट लिमिटेड खानापूर 2023-24 वर्षाचा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम व केन कॅरियरचे पूजन श्री. चन्नबसवदेवरु रूद्रस्वामी मठ बिळकी, यांच्या दिव्य सनिध्यामध्ये कार्यक्रम पार पडला.
यावेळी विद्युत शुभारंभ राज्यसभा सदस्य श्री. इराण्णा कडाडी, तसेच लैला शुगरचे चेअरमन व तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव सो. हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर दीपप्रज्वलन क्रिडा भारती कार्यदर्शी श्री. अशोक शिंत्रे, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी बेळगाव प्रमोद कोचेरी, भाजपा खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा नेते श्री. बाबुराव देसाई, एमडी लैला शुगर श्री.सदानंद पाटील, श्री. बंडू मजुकर, श्री. राजेद्र पाटील, श्री बसवराज सनिकोप, श्री. विठ्ठल करंबळकर, श्री. रवळू पाटील, श्री. चागाप्पा निलजकर, श्री. कल्लापा तीरवीर, श्री. गुडू तोपिनकट्टी, श्री. भरमानी पाटील, श्री. राजू सिद्धानी, श्री. लक्ष्मण तिरवीर व तालुक्यातील इतर नेते मंडळी तसेच श्री महालक्ष्मी ग्रुप संचालक मंडळ, व तालुक्यातून आलेले शेतकरी व साखर कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta