
खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावर प्रांतरचना झाली आणि तत्कालीन मुंबई प्रांताचा काही मराठी भाषिक भाग कर्नाटकात डांबण्यात आला. त्याचा निषेध म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांकडून 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यावर्षी देखील काळादिन गांभीर्याने पाळण्यात यावा म्हणून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज माडीगुंजी आणि नंदगड येथे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, रवींद्र शिंदे, जयराम देसाई, रणजीत पाटील, मारुती गुरव, गोपाळ हेब्बाळकर, भरत पाटील, पुंडलिक पाटील, एम पी पाटील, तुकाराम गोरल, के वाय चोपडे, शंकर गावडा, शिवानंद पाटील, विठ्ठल गुरव, तुकाराम पठाण, एम. जी. पाटील, तुकाराम जाधव, मधु पठाण तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta