खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा समितीच्या वतीने उद्याचा एक नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील संपूर्ण मराठी भाषिकांनी गांभीर्याने पाळावा व आपापले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून झालेल्या अन्यायाविरोधात केंद्र शासनाचा निषेध जांबोटी गावातील व भागातील मराठी भाषिकाने गांभीर्याने करावा यासाठी जांबोटी येथे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. आजूबाजूच्या परिसरातील बाजारानिमित आलेल्या मराठी भाषिकांनासुद्धा पत्रके वाटण्यात आली तसेच बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी स्टेशन रोड खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे सकाळी 11 ते 2 पर्यंत लाक्षणिक उपोषण व होणाऱ्या जाहीर सभेमध्ये बहुसंख्य मराठी भाषिकांनी भाग घेऊन केंद्र सरकारचा निषेध करावा यासाठी मोठी उपस्थिती जांबोटी भागामधून दिसावी असे सर्वांना आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतचे माजी सभापती सुरेशराव देसाई व समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रवी पाटील, राजू पाटील कार्यकर्ते उपस्थित होते.