निपाणी (वार्ता) : संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी जन आंदोलन सुरु आहे. याशिवाय मराठा समाजाचे मनोज जरांगे -पाटील हे आंतरवली (जि. नांदेड) येथे आमरण उपोषण करीत आहेत. या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला निपाणी येथील सकल मराठा
समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यासाठी मराठा समाजातर्फे शुक्रवारी ( ता.३) सकाळी ठिक १० ते. ५ या वेळेत येथील नरवीर तानाजी
चौकात एक दिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. तरी यावेळी समाज बांधवानी वेळेवर उपस्थित राहूनमराठा समाजाप्रती असणारी आपली बांधिलकी दाखवण्याची आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.