खानापूर : खानापूर शहरातील महांतेश सोनोळी यांच्या मालकीच्या अमय ट्रेडर्स या दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
पहिल्या दुकानाचे कुलूप तोडण्यात यश न आल्याने त्यांनी शेजारील किराणा दुकानाचे कुलूप तोडले. मात्र दुकानात ठेवलेली केवळ 50,100 रुपयांची चिल्लर सापडल्याने ते परत गेले.
तात्काळ खानापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शोध घेऊन तपास केला. गुन्हा अन्वेषण विभागाचे पीएसआय चन्नाबसव बबली यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. याबाबत कोणाला माहिती असल्यास खानापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन खानापूर पोलिसांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta