Monday , December 8 2025
Breaking News

बालकाच्या जिवदानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

Spread the love

 

खानापूर : केंचापूर गल्ली, खानापूर येथील शिवांश बिर्जे या मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया रोगग्रस्त अवघ्या 8 महिन्यांच्या बालकावरील उपचारासाठी, त्याला जीवदान देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवांश बिर्जे हा बालक मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया नामक रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. सध्या त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचे वेदनादायी उपचार सुरू असले तरी जीवनदान मिळण्यासाठी त्याच्यावर हॅप्लो आयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांट या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज आहे. मात्र या शस्त्रक्रियेसाठीचा खर्च तब्बल 20 लाख रुपये इतका मोठा आहे. या खर्चात शस्त्रक्रियेसह औषधं, रक्त उत्पादन, हॉस्पिटलायझेशन आणि महत्त्वाच्या तपासण्या यांचा अंतर्भाव असेल. तथापि आपल्या लाडक्या शिवांश याच्यावरील उपचारासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी बिर्जे कुटुंबीयांनी आजपर्यंत आपल्याकडील बचतीच्या पैशासह पै न् पै खर्च केली आहे. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक 20 लाख रुपयांची रक्कम उभी करणे त्यांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे बिर्जे कुटुंबीयांना शिवांश वरील उपचारासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला आर्थिक मदतीची आणि दैवी कृपेची, सर्वांच्या प्रार्थनेची नितांत गरज आहे. तरी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि समस्त शहरवासीयांनी आपल्या परीने शक्य होईल तितकी मदत बिर्जे कुटुंबीयांना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मदत करू इच्छिणारे शिवांशची आई नम्रता यांना 7756919530 या जीपे क्रमांकावर मदत करू शकतात.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *