खानापूर : विजयपूर येथे वकिलाचा निर्घृण खून करण्यात आल्यामुळे खानापूर बार असोसिएशनच्यावतीने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले असून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्यादिवशी कोणत्याही प्रकारच्या खटल्याची सुनावणी तसेच निकाल देऊ नये, यासाठी बार असोसिएशनच्यावतीने खानापूर न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवेदन दिले आहे. 8 डिसेंबर रोजी वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती वकील संघटनेचे कार्यदर्शी ॲडव्होकेट मारुती कदम यांनी दिली आहे.
विजयपूर येथे न्यायालयाकडे जात असताना ईरणगौडा पाटील (वय 40) या वकिलांवर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे वकील असुरिक्षत झाले असून, वकिलांसाठी तातडीने संरक्षण कायदा लागू करावा व सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावीत, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच सोमवारी 11 डिसेंबर रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्यात येणार आहे, अशी माहिती खानापूर वकील संघटनेचे कार्यदर्शी ॲडव्होकेट मारुती कदम यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta