खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावात विद्युतभारित तर तुटून दुचाकी जळून खाक झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. खानापूर हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. एक मोठी विद्युतभारीत तार दुचाकीवर तुटून पडल्याने दुचाकीस्वार बेशुद्ध अवस्थेत दुचाकीसह घसरला. या वीजभारीत तारेमुळे संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली. या हेस्कॉम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून या घटनेत सागर पाटील नामक तरुण जखमी झाला आहे. घटनेची माहिती हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून दोन तास उलटून गेले तरी अधिकाऱ्याची घटनास्थळी भेट न दिल्याने नागरिकांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. खानापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय गिरीश एम यांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला.
Belgaum Varta Belgaum Varta