
खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या बैठकीत निर्णय
खानापूर : दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व खानापूर तालुक्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या उपस्थितीत आमदारांच्या कार्यालयात सदर बैठक संपन्न झाली. यावेळी खानापूर तालुक्यातील विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी खानापूर तालुका खानापूर तालुका कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी आणि आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या स्थानिक कंत्राटदारांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. खानापूर तालुक्यातील विकासकामांचे कंत्राट बाहेरील कंत्राटदारांना कमी दराच्या टेंडरने देण्यात येत आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहे. तसेच या या कामांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे आरोप स्थानिक कंत्राटदारांनी केले आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अधिकाऱ्यांना त्यापुढे खानापूर तालुक्यातील विकास कामांचे कंत्राट स्थानिक कंत्राटदारांनाच देण्यात यावे अशी सूचना केली तसेच तालुक्या बाहेरील कंत्राटदारांनी खानापूर तालुक्यामध्ये कोणतेही टेंडर घालू नये, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यापुढे तालुक्यातील स्थानिक कंत्राटदारांनाच तालुक्यातील विकास कामांचे कंत्राट देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील कंत्राटदारांनी टेंडर कामे व पीस वर्क करण्यासाठी संघटनेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून स्थानिक कंत्राटदारांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta