
खानापूर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्यकारभार कसा चालतो हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करणयात आली. त्या कमिशनने आपला अहवाल दि. 16 जानेवारी 1956 ला जाहीर केला. त्या आहवालात बेळगाव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर हा मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक म्हैसूर राज्यात ठेवला त्यामुळे मराठी माणसाच्या मनात उद्रेक निर्माण झाला व दि. 17 जानेवारी 1956 रोजी संपूर्ण सीमाभागातील जनता रस्त्यावर आली. त्यावेळी बेळगांव व निपाणी येथे पोलिसानी गोळीबार केला. त्या गोळीबारात बेळगाव येथे चार व निपाणी येथे एक हुतात्मे झाले. त्या हुतात्म्याच्या अभिवादन करण्यासाठी सीमाभागात 17 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून आचरणात आणला जातो. त्या अनुषंगाने आज शनिवार दि. 13 रोजी खानापूर तालुक्यातील रुमेवाडी, करंबळ, कौंदल, हेब्बाळ, जळगे, लालवाडी, कारलगा, नंदगड, कसबा नंदगड, हलगा, माचीगड, शिवोली, चापगाव आदी गावात जाऊन पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
यावेळी खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, डी.एम.भोसले, बाळासाहेब देसाई, परशराम गुरव, विठ्ठल गुरव, गोपाळ मादार हणमंत गावकर, परशराम मेश्राम, रामचंद्र देसाई, रवळू फठाण, सिताराम बेडरे, महादेव घाडी, मोहन गुरव, नागेश भोसले, प्रवीण पाटील, रमेश धबाले, अमित बेळगावकर, पांडुरंग पाटील, उदय पाटील, मारुती पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta