खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता हुतात्मा कै. नागाप्पा होसूरकर, कुप्पटगिरी यांना खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा कै. पैलवान मारूती बेन्नाळकर, कै. मधू बांदेकर, कै. महादेव बारागडी, कै. लक्ष्मण गावडे आणि निपाणीतील कै. श्रीमती कमलाबाई मोहिते, तसेच ९ मार्च १९५६ रोजी सुरू झालेल्या सीमा सत्याग्रहात भाग घेतलेल्या कै. नागाप्पा होसूरकर या सत्याग्रहीनी हिंडलगा कारागृहात प्राणार्पण केले. तसेच १ नोव्हेंबर १९५८ पासून सुरू झालेल्या दुसऱ्या सीमा सत्याग्रहात कै. गोपाळ चौगुले यांनी बळ्ळारी कारागृहात प्राणार्पण केले. मुंबई येथे शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी उभारलेल्या प्रचंड आंदोलनात ६७ शिवसैनिकांनी प्राणार्पण केले, कन्नड सक्तीच्या निषेधार्थ संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीने १ जून १९८६ रोजी केलेल्या आंदोलनात हिंडलगा येथील कै. मोहन पाटील, कै. परशराम लाळगे, कै. भरमाणा कदम यांचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बळी पडला. बेळगुंदी येथील झालेल्या गोळीबारात कै. भावकु चव्हाण, कै. कल्लाप्पा उचगांवकर, कै. मारुती गावडा यांचा बळी घेतला. जुने बेळगांव येथे कै. शंकर खन्नूकर, हिंदवाडी येथे कै. कुमारी विद्या शिंदोळकर याशिवाय बॅरिस्टर नाथ पै यांनी प्राणार्पण केले. तसेच सीमाभागाचे अग्रणी नेते शेकापचे प्रमुख कै. प्राध्यापक एन. डी. पाटील या सर्व हुतात्म्यांना खानापूर येथील हुतात्मा स्मारकाजवळ विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष श्री. निरंजनसिंह सरदेसाई, माजी सभापती श्री. मारूतीराव परमेकर, माजी जि पं सदस्य श्री. जयराम देसाई, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी ता. पं. सदस्य श्री. नारायण कापोलकर, म. ए. समिती नेते श्री. प्रकाश चव्हाण, खजिनदार श्री. संजीव पाटील, सहचिटणीस श्री. रणजीत पाटील, नंदगड विभागाचे उपाध्यक्ष श्री. रमेश धबाले, गर्लगुंजी विभागाचे उपाध्यक्ष श्री. कृष्णा कुंभार, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री. जगन्नाथ बिर्जे, खानापूर शहर उपाध्यक्ष श्री. मारूती गुरव, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री. अमृत शेलार, माजी ता. पं. सदस्य श्री. पांडुरंग सावंत, माजी जि. पं. सदस्य श्री. पुंडलिक कारलगेकर, माजी जि. पं. सदस्य श्री. विलास बेळगांवकर, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री. शामराव पाटील चन्नेवाडी, सीमासत्याग्रही श्री. पुंडलिक चव्हाण, ॲड. अरूण सरदेसाई, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री अजित पाटील, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री. गोपाळराव पाटील, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य श्री. रुक्माणा झुंजवाडकर, ॲड. केशव कळ्ळेकर, श्री. मर्याप्पा पाटील, श्री. गणपती पाटील, श्री. विजयसिंह रजपूत, श्री. देवाप्पा पाटील, श्री. ईश्वर बोबाटे, श्री. यशवंत बिर्जे, श्री. गोपाळ हेब्बाळकर, श्री. म्हात्रू धबाले, श्री. तुळजाराम गुरव, श्री. मोहन गुरव, श्री. राघोबा मादार, श्री. बी. बी. पाटील सर, श्री. बी. एन. पाटील, श्री. पुंडलिक पाटील, श्री. शिवाजी देसाई, श्री. दुदाप्पा कुंभार, श्री. नितीन देसाई, श्री. पुंडलिक मोटार, श्री. संतोष पाटील, श्री. विनायक पाटील, श्री. सीताराम बेडरे, श्री.शिवाजी पाटील, श्री. शिवाजी सहदेव पाटील, श्री. रविकांत हळदणकर, श्री प्रभाकर साळगावकर, श्री. प्रल्हाद मादार, श्री. मधू पाटील, श्री. वसंत नावलकर, मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य श्री. रविंद्र शिंदे, श्री. शंकर पाटील, श्री. शरद पाटील, श्री. मुकुंद पाटील, श्री. डी एम भोसले गुरूजी, श्री. महंमद बेलगामी, श्री. लक्ष्मण पाटील, पत्रकार श्री. विवेक गिरी, श्री. एम ए खांबले, श्री. श्रीकांत पाटील, श्री. नारायण देसाई (क्लासिक टेलर), श्री. प्रवीण पाटील, श्री. वैभव बिर्जे, पत्रकार श्री. वासुदेव चौगुले, श्री. शिवानंद सुळकर, श्री. उमाकांत वाघधरे, श्री. वसंत गोरल, श्री. अनंत पाटील यांसह अनेक कार्यकर्ते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले.
कै. नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मालार्पण करून सर्व उपस्थितांच्या समवेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सीमाचळवळ आणि सीमाप्रश्न व हुतात्मे या संदर्भात माजी सभापती श्री. मारूतीराव परमेकर, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, सीमासत्याग्रही श्री. पुंडलिकराव चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, श्री. जगन्नाथ बिर्जे, अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांची हुतात्म्यांना अभिवादनपर भाषणे झाली.