खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. बैठकीमध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला पाठिंबा देण्याच्या संदर्भात चर्चा करून महामेळावा संदर्भात जागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात येईल, असे अध्यक्ष धनंजय पाटील व सचिव सदानंद पाटील यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …