Friday , December 8 2023
Breaking News

13 डिसेंबरला ‘चलो व्हॅक्सिन डेपो’

Spread the love

महामेळावा यशस्वी करण्याचा शहर समिती बैठकीत निर्णय

बेळगाव : 2006 साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे.
आपला या सीमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते. परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत अधिवेशनाला विरोध होणारच त्यामुळे शहरातील गल्लोगल्लीत जनजागृती बैठका घेऊन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन शहर समिती बैठकीत करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी शहर समितीची बैठक रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई पॅलेसमध्ये घेण्यात आली. सुरुवातीला रणजित चव्हाण-पाटील यांनी प्रास्ताविक करत महामेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
महाराष्ट्रातल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रमधून नेते उपस्थित रहाणार आहे. कानडी सरकार एकीकडे सुप्रीम कोर्टात आपले म्हणणे मांडत नाही मात्र दुसरीकडे बेळगावातील मराठी माणसांना त्रास देण्याचा खटाटोप करत असते या विरोधात मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन महामेळाव्याला उपस्थिती दाखवावी असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
मराठी माणसाची एकजूट दाखवुया आणि महामेळावा यशस्वी करूया, असे विचार कार्यकर्त्यांनी मांडले. बैठकीला समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

टिप्पर -कारचा भीषण अपघात; दोघांचा जळून मृत्यू

Spread the love  बेळगाव : देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *