खानापूर : खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील यांचा ६९ वा वाढदिवस इदलहोंड येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी आणि मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य श्री. जगन्नाथ बिर्जे, श्री. प्रकाश चव्हाण, पीएलडी बँकेचे माजी चेअरमन श्री. शिवाजी सहदेव पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य श्री. रमेश देसाई, पत्रकार श्री. विवेक गिरी, पत्रकार श्री. वासुदेव चौगुले, पत्रकार श्री. ईश्वर बोबाटे, श्री. राजाराम देसाई इत्यादींनी तसेच पिसेदेव को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे संचालक मंडळ आणि विविध संघ संस्थांच्या मान्यवरांनी माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील यांना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या. माननीय माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून आजतागायत समितीसाठी भरीव कामगिरी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य ते चेअरमन, मंडळ पंचायत प्रधान, श्री पिसेदेव को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन, गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड या शाळेच्या सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष तसेच कार्याध्यक्ष पद, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष पद, त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे आमदार अशी अनेक पदे भुषविले आहेत. त्यांनी आजवरच्या सर्व सीमासत्याग्रहाच्या आंदोलनात भाग घेतला होता. समितीच्या हयात असलेल्या आमदारांपैकी ते एकमेव आहेत जे समितीच्या कार्यात एक ज्येष्ठ नेते म्हणून सक्रिय आहेत. समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच जमलेल्या सर्व आप्तेष्ट व मित्रमंडळींकडून माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील यांना दीर्घायुषी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.