
खानापूर : शिवसेना बेळगाव आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दहा वाजता हलशीवाडी येथील जूनी मराठी शाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून शहर आणि बेळगाव तालुक्यातील विविध गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात असून शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांसह नेत्र तपासणी करून चष्मा व औषधांचे वितरण केले जात आहे याचा हलशीवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta