
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
एसपी भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, चिक्कोडी आणि खानापूर येथील चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना शोधण्यात यश आले आहे.
खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने कसून तपास करून खानापूर येथील आरोपी परशुराम नाना गौंडाडकर याच्याकडून एकूण 673.4 ग्रॅम सोन्याचे दागिने व एकूण 627 ग्रॅम. चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेखानापूरचे सीपीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पीएसआय चन्नबसव बबली. एएसआय एन. के. पाटील, हवालदार बी. जी. यलीगार, जगदीश काद्रोळी, जयराम हम्मनावर, पोलीस शिपाई मंजुनाथ मुसळी, प्रवीण होंडद, पुंडलिक मादार आणि बेळगाव तांत्रिक विभागातील विनोद ठकन्नावर या सर्वांनी दिवसरात्र कसून तपास करून गुन्हेगारांचा माग काढण्यात यश मिळवले, असे ते म्हणाले. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी तपास पथकाचे कौतुक करून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta