
खानापूर : खानापूर शहर ते गोवा क्रॉस पर्यंतच्या रस्त्याचे काम पाच दिवसांत हाती घ्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवस्वराज संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे.
खानापूर येथील शिवस्वराज जणकल्याण फाउंडेशनच्यावतीने हेस्कॉम कार्यालय ते गोवा क्रॉस पर्यंतचा रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा देत गुरुवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता प्रशांत होनकांडे यांनी रस्त्याची डागडुजी करावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत तसेच रस्त्याचे काम वेळेत हाती घ्यावी यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला माहिती देण्यात आल्याचे सांगितले.
अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी रस्ता खराब झाल्यामुळे वाहन चालकांना दररोज अपघाताला सामोरे जावे लागत आहे तसेच खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहन नादुरुस्त होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेगाने हाती घेणे गरजेचे आहे. लवकरच करंबळ आणि इतर गावातील लक्ष्मी यात्राना सुरुवात होणार आहे त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर हाती घेणे गरजेचे आहे. येत्या पाच दिवसात काम सुरू न केल्यास रास्ता रोको केला जाईल असा इशारा दिला.
शेजारी निवेदन देतेवेळी उपाध्यक्ष रमेश धबाले, सुनील पाटील, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर, प्रभाकर पाटील, प्रमोद पाटील, गोपाळ मारीहाळ, केशव घार्सी, विलास पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta