Wednesday , March 4 2026
Breaking News

बेटणेनजीक वाळू टिप्पर पलटी; चालक ठार

Spread the love

 

खानापूर : जांबोटी ते कणकुंबी दरम्यान राज्यमार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण चुकल्याने वाळू भरून गोव्याला जाणारा टिप्पर पलटी झाल्याने त्याखाली सापडून टिप्परचा मालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव गजानन विष्णू चौगुले रा. गणेबैल (वय 24) असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, नेहमीप्रमाणे गोव्याला वाळू पुरवठा करणाऱ्या गजानन चौगुले स्वतःचा टिप्पर घेऊन जांबोटी मार्गे गोव्याला जात असताना बेटणे दरम्यान कासार नाल्यानजीक पडलेला खड्ड्याला चुकवण्याच्या प्रयत्नात चालक गजानन यांचे टिप्परवरील नियंत्रण सुटले व रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाला जोराची धडक दिली. त्यामध्ये तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनामुळे गणेबैल व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *