
खानापूर : खानापूर-गोवा सीमेवरील चिखले गावातील चिखले धबधबा पाहण्यासाठी बेळगाव कॅम्पमधील विनायक, दर्शन आणि विनय हे तिघे जण आज दुपारी अडीच वाजता आले होते. त्यावेळी 20 वर्षीय विनायक सुनील बुथुलकर हा धबधब्याच्या वरच्या बाजूने दुचाकीवरून जात असताना दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत पडला.
सुदैवाने तो बचावला असून त्याच्या चेहऱ्याला व पायाला मार लागला आहे. पोलिसांनी त्याला चिखले ग्रामस्थांच्या सहाय्याने प्रयत्न करून दरीतून वरती आणले.
खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जांबोटी पोलीस उपकेंद्रातील जगदीश काद्रोळी, चालक वासू पारसेकर व चिखली येथील संजय अर्जुन पाटील व चिखले ग्रामस्थ व बेळगाव येथील विशाल तेलंगा यांनी सदर युवकाला दरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
Belgaum Varta Belgaum Varta