खानापूर : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेची शनिवारी सांगता होणार असून दुपारी 3 वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक व साहेब फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात बीडी संघाने करंबळ संघाचा एकतर्फी पराभव केला तर दुसऱ्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात श्री गणेश कणबर्गी संघाने कारलगा संघाचा पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात हलकर्णी संघाने युवा स्पोर्ट्स हलशीवाडी संघाचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पहिल्या उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत कणबर्गी संघाने बीडी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
शनिवारी उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर दुपारी अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
