खानापूर : खानापूर तालुक्यातील युवा नेते इरफान तालिकोटी यांच्या प्रयत्नातून गुंजी मराठी शाळेची पाण्याची समस्या कायमची दूर झाली. गुंजी शिक्षक, एसडीएमसी अध्यक्ष व सदस्य यांनी इरफान तालिकोटी यांची भेट घेऊन शाळेतील पाण्याची समस्या मांडली. तालिकोटी यांनी RWSAEE खाते, प्रकाश गायकवाड तहशिलदार खानापूर तालुका, जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत मुख्य सचिव या सर्व कार्यालयामध्ये स्वतः भेट घेऊन निवेदन दिले व 15 दिवसात बोअरवेल खुदाई करून देण्याची हमी दिली होती. आज दिनांक 14 मार्च 2024 रोजी तालिकोटी यांनी 15 दिवसाच्या आत दिलेले वचन पूर्ण केले. या सर्व कामात एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरलसह उपस्थित राहून पुजा करून वचन पूर्ण करत बोअरवेल खणून दिली.
या कार्यक्रमासाठी इरफान तालिकोटी, एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गोरल व सदस्य, ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष गुरव व सदस्य. शाळेचे मुख्याध्यापक बलराम बेडका, शिक्षक वर्ग व विद्यार्थी तसेच तालिकोटी यांचे कार्यकर्ते वासुदेव गोरल, अल्ताफ बिच्चनवर, लक्ष्मण मादार आणि संदीप घाडी उपस्थित होते. इरफान तालिकोटी यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.