खानापूर : कारवार (कॅनरा) लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येणार आहे.
मंगळवारी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस उमेदवारांची घोषणा आज करण्यात येणार आहे.