
खानापूर : खानापूर शहरातील पारिशवाड क्रॉसवर गांजा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 65 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. खानापूर शहराच्या पारिशवाड क्रॉसवर जाणारा महामार्ग ओलांडून बायपास जवळ एक व्यक्ती अवैध अमली पदार्थ गांजा विकत असल्याची माहिती खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांनी आरोपीवर छापा टाकून 1 किलो वजनाचा 65,000 रुपये किमतीचा सुका गांजा जप्त केला. गांजा विक्रीतून आलेले 1000 रुपये, गांजा विक्रीसाठी वापरलेली सुमारे 10,000/- किमतीची स्कूटी जप्त करण्यात आली. आरोपीला अटक करून खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला गांजा पुरवणाऱ्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta