कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी शक्तीप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज भरला. उत्तर कन्नड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
तत्पूर्वी त्यांनी कारवार येथील सिद्धिविनायक पुरातन आणि ऐतिहासिक अशा देवस्थानांना भेटी देऊन दर्शन घेऊन पुजन केले.
आज सकाळी जिल्हाभरातून आलेल्या साधारण २० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंजलीताईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
संपूर्ण कारवार जिल्ह्यातील काँग्रेस नेते मंडळी एकजुटीने एकसाथ आज ताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उपस्थित होती.
यावेळी पालकमंत्री मंकाळू वैद्य साहेब, आर व्ही देशपांडे, आमदार भिमाण्णा नाईक, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतीश सैल, विवेक हेब्बार, निवेदित अल्वा, साई गावकर यांच्यासह तालुका ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष, नेते मंडळी, कार्यकर्ते वगैरे उपस्थित होते..
यावेळेस कारवार लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला वातावरण चांगले आहे त्यामुळे नक्कीच चांगला निकाल लागेल यात काही शंका राहिली नाही.