खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याच्या महिला व मराठा उमेदवार माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर केली. याचा खानापूर तालुका आम आदमी पक्षाला मोठा अभिमान वाटत असुन दुसरीकडे भाजप सरकारने तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडी, सीबीआय याचा गैरवापर करून गुन्हा सिध्द न करता त्यांना तुरुंगात टाकले तर भाजपच्या गुन्हेगाराना वाशिंग मशिन मध्ये घालुन शुध्द केल्याचे नाटक करणारऱ्या व जनतेला गॅरट्या सांगून फसवणुक करणाऱ्या भाजप पक्षाचा कुणाचा विश्वास बसेल. तेव्हा अरविंद केजरीवाल यांच्या सुचनेनुसार आम्ही खानापूर तालुका आम आदमीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कारवार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहिर करून त्यांच्या प्रचारासाठी सज्ज असुन रात्रनदिवस खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील खेड्यात जाऊन प्रचारासाठी लढू असे आश्वासन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी शिवस्मारकात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिले.
यावेळी पत्रकार परिषदेला आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सचिव शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव, श्री कौंदलकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.