खानापूर : लोकसभा निवडणुक मराठी भाषिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदारांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी खानापूर शहरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली.
प्रारंभी शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर झांज पथकाच्या निनादात शिवस्मारक, स्टेशन रोड, निंगापूर गल्ली- घोडे गल्ली, देसाई गल्ली, विठोबा देव गल्ली, गुरव गल्ली, पारिश्वाड रोड आदी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. फेरीच्या मार्गावर सरदेसाई यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून आणि फुलांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. तसेच परिसरातील युवक मंडळांनी पाठींबा जाहिर केला. फेरीच्या सांगता प्रसंगी वाल्मिकी चौक सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
यावेळी किणेकर यांनी सरदेसाई यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या फेरीतील गर्दी पाहून खानापूरवाशीयाना समितीची ताकत दिसुन आली आहे. त्यामुळे सरदेसाई याना मोठया प्रमाणात मतदान होईल असा विश्वास असून येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयात याचिकेला गती मिळणार आहे त्यामुळे मराठी भाषिकांनी समीतीच्या पाठीशी उभे राहून महाराष्ट्र राज्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे मत व्यक्त केले.
तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक केले.
मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड एम जी पाटील, यूवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम, माजी सभापती मारुती परमेकर, पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, देवाप्पा गुरव, रणजीत पाटील, वसंत नावलकर, गोपाळ पाटील, शंकर गावडा, जयराम देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.
मुकुंद पाटील, रमेश धबाले, ज्ञानेश्वर सनदी, नगरसेवक विनोद पाटील, खानापूर समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, दत्तू कुट्रे कृष्णाचे, सूरज कुडचकर, रामचंद्र गावकर, नागेश भोसले,
सुनिल पाटील, अजित पाटील, नारायण पाटील, प्रल्हाद कदम, अर्जुन देसाई, अर्जुन गावडा, उमेश पाटील, शेखर तळवार, पुंडलिक पाटील, सुधीर नावलकर, जयदेव अंबाजी, ऍड केशव कल्लेकर आदी उपस्थित होते.