खानापूर : खानापूर फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कारण नेहमीप्रमाणे जून महिन्यापासून समुद्रामध्ये मासेमारीला बंदी घातली जाणार आहे. त्यानंतर समुद्राचे ताजे मासे खाण्यासाठी मिळणार नाहीत. म्हणून खवय्यांची गर्दी वाढत असून प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
फिश मार्केटमधील रोहित पोळ, यांच्या एम जी पी नावाने असलेल्या दुकान नंबर 7 मध्ये 80 किलोचा छत्री (तडास) नावाचा मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून खरेदीसाठी खवय्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta