खानापूर : बेळगाव-गोवा मार्गावरील गुंजी येथील माऊली देवस्थान जवळील वळणावर आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी अज्ञात व्यक्ती गोमांस विक्रीच्या तयारीत असल्याच्या माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी एक महिंद्रा बोलेरो गाडी व त्यामध्ये असलेले 78 हजार रुपयांचे म्हशीचे 600 किलो मांस जप्त करण्यात आले. परंतु मांस विक्री करणारे गाडी सोडून पळून गेल्याने सापडू शकले नाहीत.
सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून, याप्रकरणी महिंद्रा कंपनीची बलेरो गाडी क्रमांक केए 22 डी 9871 पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta