खानापूर : आज सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी यांच्यावतीने खानापूर बस डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. खानापूर जांबोटी मार्गावरील मोदेकोप, उतोळी, दारोळी या गावांमधील विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थी हे शिक्षणाकरिता ओलमणीच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये येतात. मात्र योग्यवेळी बसची सुविधा नसल्याकारणाने या विद्यार्थ्यांची फरपट होत असते आणि त्यासाठीच या शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता खानापूरवरून जांबोटीला येणाऱ्या बसच्या वेळेमध्ये बदल करावा किंवा खानापूर जांबोटीसाठी एक नवीन बसची सोय करावी अशा प्रकारचे निवेदन सादर केले आहे आणि त्यानुसार डेपो मॅनेजर महेश सर यांनी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्टीचा विचार करून आपण खानापूर आणि जांबोटीसाठी एक स्पेशल बसची सोय करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे ही बस सकाळी 9.00 वाजता डेपोतून सुटेल व संध्याकाळी जांबोटीतून 4.45 निघेल. त्यामुळे येत्या काळात या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने आपण तातडीने बस सेवा सुरू करणार अशा प्रकारचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. ही बस सेवा सुरू झाली तर या विद्यार्थ्यांच्या बरोबरच इतर सरकारी नोकर तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या बसची फार मोठी सोय होणार आहे. निवेदन देताना मुख्याध्यापक सी. एस. कदम सर मुख्याध्यापक पी. आर. गुरव सर सहशिक्षक एस. टी. मेलगे सर श्रीमती वर्षा चौगुले व श्री. ए. जे. सावंत सर यावेळी उपस्थित होते.