खानापूर : दि. विनर्स सौहार्द सोसायटी नियमित, जांबोटी या संस्थेचे दि. 20 जून रोजी उद्घाटन संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष व चेअरमन श्री. सुरेश गंभीर व त्यांच्या पत्नी सौ. संगीता गंभीर यांच्या हस्ते फित कापून या पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. दि. विनर्स ग्रुप ही इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारी संस्था आजवर ग्राहकांना वीमा सेवा प्राप्त करून देत होती. वीमा क्षेत्राबरोबरच आता सहकार क्षेत्रात या समुहाने पदार्पण केले आहे.. जांबोटी, तालुका खानापूर येथे पहिली विनर्स सौहार्द सोसायटी सुरू करण्यात आली असून अद्ययावत सोयीसुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्री. सुरेश गंभीर यांनी संस्था स्थापने मागचा उद्देश व पुढील वाटचालीविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य व्हा. चेअरमन प्रदिप भांजे, सुधीर गंभीर, विश्वनाथ घाडी, विजयकुमार वड्डर, शिवकुमारय्या कुलकर्णी, जयश्री देसाई, समीना सावंत, रेणुका गुरव, रूपा कुलकर्णी, सविता जाड्डर, सानिका नाईक, कावेरी गणीगेर, संतोष गुरव, निकिता जाधव तसेच हितचिंतक व कुटूंबीय उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रसाद सावंत यांनी मानले.