बेळगाव : योग मुळात एक आध्यत्मिक शिस्त आहे जी अंत्यत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रीत करते. योगामुळे शारीरिक, मानसिक विकास होतो, असे प्रतिपादन नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा हन्नूरकर यांनी केले आहे.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्रा. एन. व्ही. पाटील यांनी प्रास्तविक आणि स्वागत केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर योगाची प्रत्यक्षिके प्रा. राणी मडवळकर यांनी करून दाखविली आणि प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली. प्रा. एम. आर. मिराशी यांनी योगाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.