बेळगाव : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेली ही शाळा पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून २०२४ या शैक्षणिक वर्षांपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. प्राथमिक शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राबविलेल्या या उपक्रमाला
बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष तथा येळ्ळूर मतदार संघाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. रमेश गोरल यांचे याकामी सहकार्य मिळाले. व्हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, लगोरी, चेंडू व इतर साहित्य मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. पालक शंकर पाटील यांनी आपले वाढदिवसाचे औचित्य साधून राबविलेल्या उपक्रमाबद्दल धनंजय पाटील यांचे आभार मानले. यावेळी निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, शाळेचे शिक्षक प्रकाश देसाई, हणमंत पाटील, मुरलीधर पाटील, उदय पाटील, दत्ताराम पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश पाटील, कार्तिक पाटील, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta