खानापूर : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तिच्या पतीला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असल्याची घटना मंगळवारी खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी येथे घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी गावातील २४ वर्षीय तरुण हा मंजुनाथ डुगनावर याने
गावातीलच १५ वर्ष-८ महिन्याच्या अल्पवयीन मुलीशी २६ मे रोजी विवाह केल्याची तक्रार सोमवारी महिला व बालविकास विभागात दाखल होताच संबंधित अधिकाऱ्यांनी मुलगी राहत असलेल्या हिरेमुन्नळ्ळी येथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयांना बेळगाव येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या बालविवाहाचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येईल, असे खानापूर तालुका बालविकास योजना अधिकारी चंद्रशेखर सुखसारे यांनी सांगितले.