
युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये गुरुवार दि. ४ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या व इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
हरसनवाडी, रामगुरवाडी, बाचोळी, छ. शिवाजी नगर, हलकर्णी, डूक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी, मणतूर्गा, असोगा, शेडेगाळी, हारुरी, रुमेवाडी प्राथमिक शाळांमध्ये साहित्याचे वितरण झाले.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, श्री. राजाराम देसाई, ए. बी. मुरगोड, सुहास पाटील, युवा समितीचे शैक्षणिक प्रमुख आशिष कोचेरी, निखिल देसाई आदी उपस्थित होते.
श्री. आबासाहेब दळवी यांनी मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून शिक्षक व पालकांनी शाळेच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे, तसेच आपल्या पाल्यांच्या बुध्दीचा सर्वांगीण विकास मातृभाषेतून होतो त्यामुळे कोणीही न्यूनगंड न बाळगता मराठी शाळेतून शिक्षण द्यावे असे आवाहन केले.
आशिष कोचेरी याने युवा समितीच्या शैक्षणिक कार्याची व उपक्रमाची माहिती दिली, युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचे सातवे वर्ष असून यावर्षी सुद्धा खानापूर तालुक्यातील दुर्गम भागासह बेळगाव तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सदर उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta