खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. यावेळी सार्वजनिक आस्थापनांचे मराठीत नामकरण करून तसे फलक लावावेत यासंदर्भात यापूर्वी परिवहन महामंडळ, खानापूर, बेळगांव, हुबळी कार्यालयांना यासंबंधीत निवेदन दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत सचिव आणि संबंधित मंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. परंतु याची अंमलबजावणी न करता येत्या १२ जुलै २०२४ रोजी खानापूर हायटेक बस स्टॅण्ड व नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी इस्पितळाच्या इमारतीचे उद्घाटन राज्य सरकारच्या मंत्री महोदयांमार्फत करण्याचे आयोजित केले आहे. तरी यासंदर्भात विचारविनीमय करून पुढील निर्णय घ्यावयाचा आहे. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई व सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta