बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ७ धबधब्यांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
विकेंडला या भागातील धबधबे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. बेळगावात मुसळधार पाऊस, नद्या, धबधबे ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून पर्यटकांना धबधबा पाहण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
बटावडे धबधबा, चिकले धबधबा, परवाड धबधबा, चोर्ला धबधबा, वज्र धबधबा यासह ७ धबधबे पर्यटकांसाठी मर्यादित असून वनविभागाकडून गस्त घालण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta