खानापूर : पावसाळ्यात संसर्गजन्य आधार मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ देसाई यांनी केले आहे.
बेळगाव येथील प्रसाद फार्मसीच्या सहकार्याने हलशीवाडी येथे डेंग्यू लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांना देसाई यांनी मार्गदर्शन केले पावसाळ्यात आणि ठिकाणी पाणी साचून डास वाढतात त्यामुळे ग्रामपंचायतीने देखील ठिकठिकाणी व सातत्याने औषधांची फवारणी करावी आणि आरोग्य खात्याने नागरिकांना संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत या दृष्टीने मार्गदर्शन करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी गावातील नागरिकांना डेंग्यूची लस देण्यात आली. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन देसाई, मिलिंद देसाई, राजु देसाई, बंडू देसाई, प्रशांत देसाई, प्रज्ञेश देसाई, साईश सुतार, गजानन देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta