खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक सभा
सोमवार दिनांक ८ जुलै रोजी पार पडली.
खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीतील ठराव व निर्णयानुसार उद्या बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूर तहसीलदारमार्फत कर्नाटक राज्य माननीय मुख्यमंत्री यांना कर्नाटक राज्य नोकरांच्या सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी विलंबाबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
कर्नाटक राज्य नोकर संघाचे राज्याध्यक्ष यांच्या निर्देशानुसार वरील निवेदन देण्याकरिता तालुका खानापूर येथील सर्व निवृत्त कर्नाटक राज्य नोकर यांनी वेळेत उपस्थित राहून शांततेत व संघटितपणे सविनय निवेदन देण्यास उपस्थित राहून सहमती व सहकार्य करावे असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोसी सर यांनी आव्हान केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta