खानापूर : खानापूर तालुक्याच्या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या हायटेक बस स्थानक इमारत तसेच माता आणि शिशु हॉस्पिटल इमारतसह हेस्कॉम कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा लांबणीवर पडला आहे. येत्या शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सदर तिन्ही शासकीय इमारतींचा उद्घाटन समारंभ मंत्री तसेच जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नियोजित झाला होता. परंतु येत्या १५ जुलै ते २६ जुलै दरम्यान राज्याचे पावसाळी अधिवेशन असल्याने खानापुरातील सदर उद्घाटन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला असल्याची माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली.
सदर तिन्ही शासकीय इमारतींचा उद्घाटन समारंभ मंत्री महोदयांच्या टीपी नुसार निर्दीत करण्यात आला होता. परंतु अधिवेशनच्या पूरसंध्येला सदर उद्घाटन कार्यक्रम करणे हे जमणे शक्य नसल्याने या कार्यक्रमाला सर्वांची अनुपस्थिती राहू शकते अशी सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे संबंधित मंत्र्यांनी केली. त्यामुळे शुक्रवार दि. १२ जुलै रोजी होणारा उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून अधिवेशन झाल्यानंतर या लोकार्पण सोहळ्याची तारीख ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta