खानापूर : खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना ही नोंदणीकृत संस्था ही गेल्या ५ ते ६ वर्षापासुन ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अविरत सेवा देत असुन या संस्थेत अनेक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.
तेव्हा मुख्यमंत्र्यानी वेतन आयोगाचा अहवाल लागु करताना राज्य कर्मचारी संघाला यापूर्वीच आश्वासन दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी लांबवल्याने सर्व कर्मचारी चिंतेत आहेत.
तेव्हा शासनासमोर न्याय सातव्या वेतनाची अंमलबजावणीची मागणी किमान २७.५ टक्क्यांनी वाढली आहे. १ एप्रिल २०२४ पासुन शासनाने आर्थिक मंजुरी देणारा आदेश जारी करावा, अशा मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्याना तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यामार्फत खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना व निवृत्त नोकर संघ यांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्विकार करून निवेदन सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना अध्यक्ष व्ही. एम. बनोशी, सी. एस. पवार, डी. एम. भोसले, आबासाहेब दळवी. एल. डी. पाटील, ए. आर. मुतगेकर, व्ही. एन. पाटील, ए. एम. बोर्जिस, बी. एन. पाटील, जयसिंग पाटील व अनेक निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.