Wednesday , April 22 2026
Breaking News

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर येथील सांस्कृतिक व ई.ल.सी‌. विभागाचा उद्घाटन सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दि. ९-७-२४ आळवण गल्ली शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय शहापूर बेळगाव येथे सांस्कृतिक विभागाचे व ई.ल.सी उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी प्रियांका हिच्या स्वागत नृत्याने व इशस्तवन गीताने झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपनिर्देशक श्री. एम. एम. कांबळे सर तसेच श्री. गोविंदराव टक्केकर (इंजिनीयर व बिल्डर) तसेच अध्यक्ष स्थानावर विश्वभारत सेवा समितीचे सचिव श्री. प्रकाश नंदीहळी सर होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आली. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्या सौ. ममता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कांबळे सर म्हणाले कोणतेही गोष्ट शिकण्याची जिद्द असली पाहिजेत परीक्षेची रुपरेषा सांगितली तसेच बुद्धीही स्वतः कमवायला पाहिजे ती कोणाकडून मागून मिळत नाही आणि आयुष्यात खेळ आणि स्पर्धा किती महत्त्वाच्या आहेत ते सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले श्री. गोविंदराव टक्केकर यांनी वेळेचं आणि अभ्यासाचे महत्त्व जीवनात किती आहे ते सांगितले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रकाश नंदीहळी सरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शिक्षक रुंद आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता मुतगेकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सुरज हत्तलगे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *