खानापूर : खानापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महसूल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला असून येथील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी आम. विठ्ठल हलगेकर यांनी कर्नाटक सरकारच्या महसूल विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान मुख्य सचिव रश्मी व्ही. महेश यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर नुकसानग्रस्त ठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर योग्य ती भरपाई देण्याचे आश्वासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta